लोकसभा निवडणूक 2019 घोषणा आज संध्याकाळी 5 वाजता होणार

0
75

लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज, म्हणजे 10 मार्चला संध्याकाळी पाच वाजता होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

रविवारी संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेणार आहे, असं आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी शेफाली शरण यांनी बीबीसीच्या नितीन श्रीवास्तव यांना सांगितलं.

लोकसभा निवडणुकीची तारीख काय असेल याचा अंदाज वेगवेगळे तज्ज्ञ लावत आहेत. महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीला एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. यावेळी एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY